कुस्ती – एक साहसी खेळ (Wrestling – an adventure sport)

एक साहसी खेळ म्हणून कुस्ती या खेळाची ओळख आहे. हा खेळ पूर्वीपासून खेळला जात आहे . जत्रा, मेळावे यांचे आयोजन गावोगावी होते. तसेच कुस्त्याचे सुद्धा आयोजन गावोगावी केले जात असत. एकमेकांच्या गावाला बक्षीस देत असत. कुस्ती हा खेळ दोघांमध्ये खेळला जातो. निर्णयक्षमता व डाव या खेळात महत्त्वाची असतात. या खेळात अनेक डावपेच असतात . जसे निकाल, ढाक, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, धोबीपछाड व  असे अनेक डाव आहेत. हा खेळ अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. जाड सतरंजीवर कुस्तीचे ओलिंपिक सामने खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक प्रकार आहे.

कुस्तीपटू खाशाबा जाधव ((Wrestler Khashaba Jadhav))

कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव हे एक भारतीय फ्रीस्टाइल (freestyle) या प्रकारचे महान कुस्तीपटू होते. १९५२ मधील हेलसिंकी (Helsinki) येथे उन्हाळी ऑलिंपिकमध्ये (Olympics) भारतासाठी त्यांनी कांस्यपदक जिंकले व  त्यासाठी ते फार प्रसिद्ध आहेत. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. इ.स. १९०० मध्ये, वसाहतकाळात भारतासाठी ॲथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके (Silver medals) जिंकणाऱ्या नॉर्मन प्रिचर्ड (Norman Pritchard) यांच्यानंतर खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक खेळाडू होते, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते.

कुस्ती सुरू करतात सर्व प्रथम, दोन्ही पैलवान क्रीडा क्षेत्राच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी येतात. त्यानंतर ते एकमेकांशी हात मिळवतात. त्याचवेळी रेफ्री Referee) दोघांचीही तपासणी करतात की कोणत्याही खेळाडूकडे काही आक्षेपार्ह आहे का हे पाहण्यासाठी. यानंतर रेफरी दोघांना रिंगणाच्या टोकाला पाठवतात. त्यानंतर  रेफ्री शिट्टी वाजवून कुस्ती सुरू करण्यात येते. कुस्तीचा निर्णय दोन प्रकारे होतो. गुणांच्या आधारावर आणि चितपट करण्याच्या आधारावर कुस्तीसाठी दांडग्या शरीरयष्टी सोबतच चपळ आणि हुशार बुद्धिमत्तेची गरज असते. कुस्ती हा खेळ खेळताना दोन्ही कुस्तीपटूंना हा खेळ खेळण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी दिला जातो आहेत ज्यात ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकतात.

कुस्ती खेळाचे नियम (Rules of wrestling)

या खेळाचा पहिला नियम असा आहे की हा खेळ खेळताना पैलवान कोणत्याही प्रकारचे कपडे घालू शकत नाही, तो लंगोट बांधूनच हा खेळ खेळतो.  पैलवान स्वतःच्या अंगावर कोणताही तेलकट पदार्थ लावू शकत नाही.कुस्ती या खेळात जो कोणी खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या पैलवानाचा केस ओढतो, गळा दाबतो, किंवा पैलवानाच्या पायाची किंवा हाताची बोटे फिरवतो, आणि जर एखाद्या पैलवानाने जाणूनबुजून एखाद्याला मारले तर फाऊल दिला जातो.जर कुस्तीपटू कुस्तीच्या नियमांचे उल्लंघन करत असले तरी त्याला सुरुवातीला फक्त इशारा दिला जातो आणि जर त्याने त्या इशाऱ्याने आपल्या चुका सुधारल्या नाहीत तर त्याला सावधगिरीचा इशारा दिला जातो.

Leave a comment

विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार: रोहित शर्मा – ५०* संत ज्ञानेश्वर १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे (Famous places in Mumbai) एक साहसी खेळ – कुस्ती