मुंबईतील  10  प्रसिद्ध ठिकाणे

10 Famous places in Mumbai

1. संजय गांधी राष्ट्रीय       उद्यान

बोरिवली पूर्वला असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (National Park) पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूत सुंदर दिसतं. जीवनाला मिळणारा हा समृद्ध आरोग्यदायी असा श्वास आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 274 पेक्षा अधिक पक्षांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात.या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत.

2. जहांगीर आर्ट गॅलरी

जहांगीर आर्ट गॅलरी हे मुंबई मधील एक कलादालन (Art Gallary) आहे. हि आर्ट गॅलरी’ दक्षिण मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या मागे, गेटवे ऑफ इंडियाजवळ काळा घोडा येथे आहे आणि त्यात चार प्रदर्शन हॉल आहेत. दरवर्षी येथे नेमाने बॉम्बे आर्ट सोसायटी, इंडियन आर्ट सोसायटीची वार्षिक प्रदर्शने, राज्य कला प्रदर्शने अशी प्रदर्शने होतच असतात.

3. दादासाहेब फाळके      चित्रनगरी

दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्म सिटी (Film City) ही मुंबई मधील गोरेगाव पूर्व या ठिकाणी आहे. हे एक फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ वसलेले आहे. यात अनेक थिएटर रेकॉर्डिंग रूम, बागा, तलाव, आणि मैदाने आहेत जी अनेक मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांचे ठिकाण म्हणून काम करतात.

4. छत्रपती शिवाजी महाराज      पार्क

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबईच्या दादर या भागामधे आहे. हे मैदान सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे.  शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे. या मैदानावर एका बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा इ.स. १९६६मध्ये उभारण्यात आला.

5. छत्रपती शिवाजी महाराज      टर्मिनस

सीएसएमटीचे आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) असे होते, हे मुंबई शहरामधील सर्वात मोठे व एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे.  येथे मध्य रेल्वेचे मुख्यालयसुद्धा आहे. सीएसएमटी हे स्थानक मुंबईच्या बोरीबंदर भागात आहे हे स्थानक इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.

6. गेटवे ऑफ इंडिया आणि     ताजमहाल हॉटेल

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) ही एक इमारत आहे. १९११ मध्ये भारताला मिळालेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. ताजमहाल (Taj Hotel) हे मुंबईतील एक ५ स्टार हॉटेल आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच ही इमारत आहे. मुंबई येथील बहुंतांश पर्यटक हॉटेल ताज समोर जाऊन येतात. हॉटेल ताज मुंबईच्या इतिहासातील अविभाज्य घटक आहे.

7. वांद्रे-वरळी सागरी मार्ग

मुंबई शहरामधील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे वांद्रे-वरळी सागरी मार्ग (Bandra–Warli Sea Link) हा आहे. अरबी समुद्रावर बांधला गेलेला हा पूल मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडतो. हा सर्वात लांब सागरी पूल आहे, सी-लिंकमुळे वांद्रे आणि वरळी दरम्यानचा प्रवास वेळ 20 – 30 मिनिटांवरून 10 मिनिटांपर्यंत कमी होतो.

8. माझगाव डॉक्स

भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक ‘माझगाव गोदी’ म्हणजेच माझगाव डॉक्स लिमिटेड हे आहे. त्यांचे मुख्य कार्य हे  भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या यांची निर्मिती करणे.  तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, प्रवासी जहाजे, कार्गो बल्क कॅरियर्स, व होड्या निर्मिती करते.

9. जुहू चौपाटी

जुहू चौपाटी हे मुंबईतील एक हवेशीर, संपन्न, समुद्रकिनारी परिसर आहे. येथे शहरातील सर्वाधिक श्रीमंत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची घरे आहेत. जुहू हे शहरातील सर्वात श्रीमंत परिसरांपैकी एक आहे  डिझायनर दुकानांपासून, समुद्राची दृश्ये असलेली रेस्टॉरंट्स, पब, डिस्को, किनाऱ्यालगतची असंख्य हॉटेल्स आणि रस्त्यावरील विविध खाद्यपदार्थ, जुहूमध्ये हे सर्व आहे.

10. शेअर बाजार भारतीय       स्टॉक एक्सचेंज

Bombay Stock Exchange, ज्याला मुंबई शेअर बाजार म्हणूनही ओळखले जाते, हे एक भारतीय स्टॉक एक्सचेंज आहे जे मुंबईतील दलाल स्ट्रीटवर आहे. कापूस व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी 1875 मध्ये स्थापन केले. हे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे, आणि जगातील दहावे सर्वात जुने आहे.