ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे योगी व तत्त्वज्ञ होते. ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात झाला. आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातिल पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे.त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. सोपानदेव व मुक्ताबाई ही ज्ञानेश्वरांची धाकटी भावंडे व निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू.