विश्वचषकाचा इतिहासात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी

सध्या चालू असलेल्या क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघासाठी गोलंदाजीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी २३ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.

या स्पर्धेत नुकतेच सहा सामने खेळलेल्या शमीने 3 वेळा पाच बळी घेतले आहेत, ज्यामध्ये उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ७/५७  म्हणजेच ५७ रन देऊन ७ विकेट्स घेतल्या आहेत.  आणि या स्पर्धेतील हे सर्वोत्तम आकडे आहेत.

क्रिकेट विश्वचषकाचा इतिहासात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी ठरला आहे शमीने आतापर्यंत विश्वचषकामध्ये ५४ विकेट्स घेतल्या आहेत.