मुंबईतील चार प्रसिद्ध ठिकाणे भाग १ (Four Famous Places in Mumbai Part 1)

गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेल (Gateway of India and Taj Mahal Hotel)

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया ही एक इमारत आहे. १९११ मध्ये भारताला मिळालेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. ताजमहाल हे मुंबईतील एक ५ स्टार हॉटेल (5Star) आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच ही इमारत आहे. ताजमहाल हि इमारत टाटा यांच्या मालकीची आहे व त्याला ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखले जाते.

मुंबई येथील बहुंतांश पर्यटक हॉटेल ताज समोर जाऊन येतात. हॉटेल ताज मुंबईच्या इतिहासातील अविभाज्य घटक आहे. या हॉटेलने सुध्दा मुंबईला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबईसारख्या समृद्ध वसाहतीच्या इतिहासाची आठवण करून देते. समुद्रामार्गे शहरात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करणारी पहिली रचन असे देखील म्हणतात.

वांद्रे-वरळी सागरी मार्ग (Bandra-Worli Sea Link)

 मुंबई शहरामधील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे वांद्रे-वरळी सागरी मार्ग (Bandra–Worli Sea Link) हा आहे. अरबी समुद्रावर बांधला गेलेला हा पूल मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडतो.हा पूल बांधण्याअगोदर वांद्र्याहून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी माहिम कॉजवे हा एकमेव मार्ग होता. अत्यंत गर्दीच्या ह्या मार्गावरून वरळीपर्यंत पोचायला फार कालावधी लागत होता. महाराष्ट्र शासनाने ही परिस्थिती सुधारण्यासाठी अरबी समुद्रावर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. 

राजीव गांधी सी लिंक म्हणून वांद्रे-वरळी सी लिंकला ओळखले जाते. हा सर्वात लांब सागरी पूल आहे, सी-लिंकमुळे वांद्रे आणि वरळी दरम्यानचा प्रवास वेळ 20 – 30 मिनिटांवरून 10 मिनिटांपर्यंत (10 Minutes) कमी होतो. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड (MSRDC) ने सुरू केला होता. 

माझगाव डॉक्स (Mazgaon Docks)

भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी (Shipbuilding) स्थानक ‘माझगाव गोदी’ म्हणजेच माझगाव डॉक्स लिमिटेड हे आहे. त्यांचे मुख्य कार्य हे  भारतीय नौदलासाठी (Indian Navy) युद्धनौका व पाणबुड्या (Warships and submarines) यांची निर्मिती करणे. तसेच तेल खननासाठी (Oil Mining) आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, प्रवासी जहाजे, कार्गो बल्क कॅरियर्स, व होड्या (Passenger ships, cargo bulk carriers, and boats) निर्मिती करते. 

नारायण प्रसाद, हे माझगाव डॉक्सचे अध्यक्ष आहेत .त्यांनी 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांचे वर्तमान अध्यक्ष पद स्वीकारले.यार्डमधील जहाज बांधणी, पाणबुडी बांधणे आणि ऑफशोअर स्ट्रक्चर्सचे फॅब्रिकेशन (Fabrication of offshore structures). त्याची उत्पादन सुविधा हि मुंबई आणि न्हावा येथे आहे.

जुहू चौपाटी (Juhu Beach)

जुहू चौपाटी हे मुंबईतील एक हवेशीर, संपन्न, समुद्रकिनारी परिसर आहे. येथे शहरातील सर्वाधिक श्रीमंत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची (Bollywood celebrities) घरे आहेत. जुहू हे शहरातील सर्वात श्रीमंत परिसरांपैकी एक आहे  डिझायनर (Designer) दुकानांपासून, समुद्राची दृश्ये असलेली रेस्टॉरंट्स, पब, डिस्को, (Restaurants, Pubs, Discos,) किनाऱ्यालगतची असंख्य हॉटेल्स आणि रस्त्यावरील विविध खाद्यपदार्थ, जुहूमध्ये हे सर्व आहे.

मुंबईमध्ये जुहु चौपाटी हा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. सागरी किनारपट्टीवरील किनारा पासून 5 किमी अंतरावर पसरलेला आहे. पर्यटक याठिकाणी  वारंवार येतात व जुहु चौपाटीला भेट देतात.जुहु चौपाटीवर संध्याकाळी फार गर्दी पाहायला मिळते. पर्यटक ताजी हवा (Fresh Air) आणि आनंदाने समुद्र किनार्यावर आनंद घेण्यासाठी येतात.

Leave a comment