होळी (Holi)

हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्मा देवा कडून वरदान मिळवलेले होते. जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपने केला तेव्हा वराह अवतार धारण करून विष्णूने त्याचा विनाश केला. त्यामुळे हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले होते. हिरण्यकश्यपाला देवतांविषयी अतिशय तिरस्कार होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे.

पण त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद हा बालपणापासून विष्णूचा परमभक्त होता. दिवस-रात्र प्रल्हाद विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असल्याने . नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न त्याने केला. परंतु, प्रत्येकावेळी तो अयशस्वी ठरला.

हिरण्यकश्यप सगळे उपाय करून थकलेला त्याची बहीण होलिका म्हणाली, तुझा त्रास मला बघवत नाही.अग्नी देवाकडून मला असा वरदान आहे की आग मला जाळू शकत नाही.मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे अग्नीत मी जळणार नाही पण तो जाळून खाक होईल.

गावात वाळलेल्या कात्क्याने मोठी पेढी हिरण्यकश्यपने तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली. व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंधीत होती. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जाळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला होलिका मात्र जाळून खाक झाली. आणि प्रल्हादच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला.तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. सत्याचा प्रकाश पसरवत, असत्याला जाळणे हा  होलिका दहनामागील मुख्या उद्देश आहे. म्हणून होळीला फार महत्त्व आहे.

Leave a comment

विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार: रोहित शर्मा – ५०* संत ज्ञानेश्वर १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे (Famous places in Mumbai) एक साहसी खेळ – कुस्ती