Why “अक्षय तृतीया” “Akshaya Tritiya” is one of the important day, to initiate new things?
अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे त्यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याचा शुभ दिवस!
शुभ क्षण!!
म्हणून या दिवशी आपण चांगले कार्य करण्यास सुरुवात करावी, त्यात पूजाअर्चा, सण, समारंभ, आनंदोत्सव, एकमेकांना भेटणे, कपडे लत्ते, नवीन वस्तू यांची खरेदी करावी, या दिवशी विशेषतः सोने खरेदी करण्याचा प्रघात आहे. सर्वसाधारण लोक सोन्याची खरेदी करतात मग भले एक ग्राम पासून पुढे सोन्याची खरेदी आपापल्या आयपतीप्रमाणे केली जाते.
Akshaya Tritiya / अक्षय तृतीया म्हणजे अक्षय म्हणून या दिवशी जे काही कराल ते अक्षय तुमच्याकडेच राहील म्हणून हा मुहूर्त महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे सोने खरेदी केल्यास ते तुमच्याकडे अक्षय राहील अशी भावना आपली तयार होते आणि आपण मग ते सोने आपल्याकडेच राहील असा प्रयत्न करतो. आपण ते आपल्याकडेच ठेवतो.
तसेच या दिवशी आनंद उत्सव साजरा केल्याने पुढे आपले आयुष्य आनंदी जाइल असेही गृहीत धरण्यात येते. अक्षय तृतीयेच्या दिवशीच गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले आहे अशी अख्याइका प्रचलित आहे. म्हणूनही हा दिवस महत्त्वाचा आहे. कारण गंगेचे अवतरण झाल्यामुळे पृथ्वीवर पाण्याचा विपुल पुरवठा झाला. पुरेसे पाणी गंगेच्या प्रवाहापासून आपणास मिळाले.
त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या या तिथीला परशुराम जन्मोत्सव, त्रेता युगाची सुरुवात, सुदामा कृष्ण भेट, वेद व्यास यांनी महाभारत लिहिण्याची सुरुवात, पांडवाना अक्षय पात्र भेट मिळालेले आहे. तसेच महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव आणि जैन वर्षतप समापन दिवसही आहे. असे अनेक शुभ आणि सामाजिक कार्याची या तिथीला सुरुवात झालेली आहे, म्हणूनही हा दिवस महत्त्वाचा आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे धनसंपत्ती, सुख आणि समृद्धी यांच्यात वाढ होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजाअर्चा करून आंब्याचा रसाचा नैवेद्य दाखवण्याचा प्रघात आहे. कारण या दिवसात ज्या फळात पाणी जास्त आहे अशी फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्यातली त्यात आंबा हा फळांचा राजा आहे आणि आंब्याच्या फळात ही पाण्याचे प्रमाण जास्त आहे म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या फळाला मान आहे. या दिवसापासून आंब्याचे फळ हे पूर्णपणे परिपक्व झालेले असते आणि त्याची मधूर चव आपणास चाखता येते.
अक्षय तृतीयेपासून आपण आनंदोत्सवास सुरुवात करावी म्हणजे आयुष्यभर आपण आनंदी आणि उत्साही राहू!
आनंदी राहा! उत्साही रहा!!
CultureMarathi टीम कडून तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!
मन ढोकळे सर, डोंबिवली.