कबड्डी – भारतातील एक सांघिक खेळ (Kabaddi – A team sport of India)

भारतामध्ये एक सांघिक खेळ म्हणून कबड्डी हा खेळ ओळखला जातो, कब्बडी या खेळाची सुरुवात तामिळनाडूमध्ये झाली. महाराष्ट्र या राज्यांत हुतुतू या नावाने हा खेळ खेळला जातो. आशियाई देशांमध्ये (Asian countries) कबड्डी हा खेळ लोकप्रिय आहे. भारताच्या इतिहासात २०व्या शतकात हा खेळ स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय झाला. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, ओडिशा, पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हा खेळ खेळला जातो.कबड्डीची प्रमुख शाखा म्हणजे “मानक शैली”, यात कबड्डी हा खेळ आयताकृती कोर्टवर खेळला जातो. प्रमुख आशियाई खेळांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हीच शैली वापरली जाते.

कबड्डी कशी खेळतात (How to play kabaddi)

हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघामध्ये सात खेळाडू खेळतात. रेडर (V) म्हणून ओळखला जाणारा खेळाडू ,हा विरुद्ध संघाच्या दिशेला जाऊन त्यांच्या बचावकर्त्यांना स्पर्श करतो, आणि स्वतःच्या कोर्टात परत जातो. रेड करत  असताना विरोधी संघाच्या बचावकर्त्यांचा स्पर्श करून एका दमात त्याला परत यावे लागते. रेडरने स्पर्श केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठीएक गुण मिळतो, व  विरोधी संघला त्या रेडरला थांबवन्यासाठी एक गुण दिला जातो. संघाने टॅग किंवा टॅकलमधून मिळवलेल्या प्रत्येक गुणासाठी आपल्या संघातील आऊट झालेल्या खेळाडूला परत आणता येते.

हा खेळ मूळचा भारतीय आहे परंतु श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, पाकिस्तान, भूतान, नेपाल असा अनेक देशांमध्ये हे खेळ खेळले जातात. जपान याही देशात तो प्रसारीत झाला आहे. हा खेळ खेळताना प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने एक-एक खेळाडू पाठवत असतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. बदली खेळाडू म्हणून इतर पाच खेळाडू खेळवले जात असतात. यामध्ये पुरुषांसाठी वीस मिनिटे व  महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळण्याची संधी दिली जाते. सामन्यात गुणांची बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटे डाव खेळवला जातो. 

कबड्डी या खेळाची सुरुवात (The beginning of the game of Kabaddi)

कबड्डी या खेळाचे नियम इ.स. १९३४ मध्ये तयार करण्यात आले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी इ.स. १९३६ मध्ये या खेळाच्या प्रसिद्धीसाठी  प्रदर्शनीय सामना बर्लिन ऑलिंपिकमध्ये खेळून दाखवला.  भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून इ.स. १९३८ पासुन हा खेळ ओळखला जाऊ लागला. अखिल भारतीय कबड्डी संघाची स्थापन १९५० मध्ये करण्यात आली. महाराष्ट्राने जे नियम या खेळाकरिता निश्चित केले होते त्या नियमानुसार संपूर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळाला जाऊ लागला. 

कबड्डीला कानाकोपऱ्यात पोहचण्यात अनेकाने मेहनत घेतली. महाराष्ट्राने कबड्डी या खेळाला आंतरराष्टीय स्थरावर जाण्यासाठी खूप मोठी भुमिका साकारली आहे. भारतासाठी कबड्डी या खेळमध्ये पुरुष व महिला या दोघांनी  विश्वकप जिंकलेला आहे. प्रो कबड्डी सामाण्यामुळे या खेळाची प्रसिद्धी फारच वाढली आहे. 

खेळाकरता लागणारे मैदान पुरुषआणि महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी (12.50 m. By 10 m.) तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. (11 m. By 8 m.) असे आयताकृती क्रीडांगण असतात . क्रीडांगण बनवताना शेणखत चाळलेली माती यांचा वापर करून  मैदान एकसारखे सपाट तयार केले जाते. पूर्वी मैदानावर होणारा खेळ आता बंद जागेत व मॅटवरही (Mat) खेळवला जात आहे. हा खेळ जास्त प्रमाणात माती मध्ये खेळला जातो.’कब्बडी’ हा शब्द खेळाडूस चढाया करताना सलग उच्चारावा लागतो.जर असे केले नाही तर फाउल (Foul) करतात. 

Leave a comment

विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार: रोहित शर्मा – ५०* संत ज्ञानेश्वर १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे (Famous places in Mumbai) एक साहसी खेळ – कुस्ती