जहांगीर आर्ट गॅलरी – मुंबई मधील एक कलादालन (Jahangir Art Gallery)

जहांगीर आर्ट गॅलरी हे मुंबई मधील एक कलादालन (आर्ट गॅलरी) आहे. मुंबई शहरातील अशा जुन्या वास्तूनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.  मुंबईतल्या या अशा काही वास्तूंपैकी एक महत्त्वाची इमारत म्हणजे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ हि आर्ट गॅलरी दक्षिण मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या (The Prince of Wales Museum) मागे, गेटवे ऑफ इंडियाजवळ काळा घोडा येथे आहे आणि त्यात चार प्रदर्शन हॉल (Exhibition hall) आहेत. गेल्या ६० वर्षांमध्ये जनसामान्यांपासून ते कलासंग्रहकांपर्यंत व चित्रकारांपासून ते  शिल्पकारांपर्यंत सर्वांचे जहांगीर आर्ट गॅलेरीशी ऋणानुबंध जुळलेले आहेत.

जहांगीर आर्ट गॅलरीची स्थापना (Establishment of Jahangir Art Gallery)

त्याकाळात मुंबईत प्रदर्शने भरवण्यासाठी आर्ट गॅलरीज नव्हत्या. बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक (Barrister V. V. Oak), चित्रांचे संग्राहक डॉ. होमी भाभा होते. बॅरिस्टर ओक हे चित्रकार होण्यासाठी ते इंग्लंडला (England) गेले असताना तिथली कलादालने आणि प्रदर्शने पाहून मुंबईतही असे कलादालन व्हावे असे त्यांना वाटले. 21 जानेवारी 1952 रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.जी. खेर (Chief Minister B.G. Kher) यांच्या हस्ते या गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले आणि सर कावसजी यांचे पुत्र जहांगीर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या आर्ट गॅलरीला ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ असे नाव देण्यात आले. तिचा इतिहास भारतीय कलेच्या पुनर्जागरणाशी जोडलेला आहे. कॉम्प्लेक्समध्ये सामोवरचा लोकप्रिय कॅफे देखील आहे, जो 1970 च्या समाजवादी संस्कृतीची आठवण करून देतो. यामध्ये देशातील सर्वात जुने परवानाधारक प्राचीन वस्तू विक्रेते (Natesans) नटेसन्स देखील आहेत.

जहांगीर आर्ट गॅलरीचे सौंदर्य (The beauty of Jahangir Art Gallery)

वास्तुकलेच्या (Architecture) दृष्टीने जहांगीर आर्ट गॅलरीला वेगळेच महत्त्व आहे. त्याचे डिझाइन (Design) १९५० च्या दशकामध्ये आर्किटेक्ट दुर्गा बाजपेयी यांनी केले. .जहांगीर आर्ट गॅलेरीची इमारत वरवर पाहताना इतर सर्वसाधारण इमारतीसारखीच वाटते. पण तिच्या रचनेतले वेगळेपण व साधेपणातले सौंदर्य, हे तिच्या रचनेतले बारकावे व लर्निंग (Learning) लक्षात घेतल्यावरच प्रत्ययास येते. २७०० चौरस फुटाचे (2700 sq.ft) ऑडिटोरियम कम आर्ट गॅलरी आणि ३,७०० चौरस फुटाची (3,700 sq.ft) मोठी आर्ट गॅलरी असे या इमारतीचे दोन प्रमुख भाग आहेत.जहांगीरची दर्शनी बाजू अगदी साध्या भितीने बनवलेली आहे. प्रवेशद्वारावरचे पुढे आलेले शिपल्याच्या आकाराचे काँक्रीटचे छत एवढाच काय तो या इमारतीचा अलंकरणात्मक भाग.प्रवेशद्वाराच्या वरच्या भितीवर असलेले जहांगीर आर्ट गॅलरी हे कॅपिटल अक्षरांमध्ये असलेले नाव साध्या आकारांच्या अक्षरामध्ये आणि ती अक्षरवळणे आर्ट डेको (Art Deco) शैलीची आठवण करून देणारी आहेत.

जहांगीर आर्ट गॅलरी विविध उपक्रमांमुळे, चित्रकार (Painter) आणि कलारसिकांच्या वर्दळीमुळे कलाक्षेत्रातील घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिली. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एस एच रझा, एम एफ हुसेन, एम आर आचरेकर माधव सातवळेकर, अशे अनेक  चित्रकार आपली प्रदर्शने करतात.अनेक प्रथितयश चित्रकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेणारी रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शनेही अनेक झाली.दरवर्षी येथे नेमाने बॉम्बे आर्ट सोसायटी, इंडियन आर्ट सोसायटीची (Bombay Art Society, Indian Art Society) वार्षिक प्रदर्शने, राज्य कला प्रदर्शने अशी प्रदर्शने होतच असतात. इतर राज्यातले चित्रकारही आवर्जुन जहांगीर आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शित करतात.

Leave a comment