दीपावली किंवा दिवाळी – एक प्रमुख हिंदू सण (Diwali)

दीपावली किंवा दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण आहे. दीपावलीला दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांत सहा दिवस या सणाचे असतात. ऑक्टोबर – नोव्हेंबर (October – November) दरम्यान हा सण साधारणपणे येत असतो. वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक असे या सणाला म्हणतात या सणाला भारतात अनेक  ठिकाणी सुटी असते. हा एक पवित्र हिंदु सण म्हणून देखील मानला जातो. 

दिवाळी हा प्रकाशाचा हिंदू सण आहे हा सण इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. उत्सवादरम्यान, घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे आणि कंदीलांनी प्रकाशित करतात. हिंदू, विशेषतः,उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे एक विधी तेल स्नान करतात. दिवाळी फटाके आणि रांगोळीच्या डिझाइनसह मजल्यांची सजावट आणि झालरसह घराच्या इतर भागांनी देखील चिन्हांकित केली जाते. मेजवानीत भाग घेणारे आणि मिठाई सामायिक करणाऱ्या कुटुंबांमध्ये अन्न हे मुख्य लक्ष आहे.  हा सण केवळ कुटुंबांसाठीच नव्हे, तर समुदाय आणि विशेषतः शहरी भागातील, जे , कार्यक्रम आणि मेळावे आयोजित करतील त्यांच्यासाठी वार्षिक घरवापसी आणि बंधन कालावधी आहे. अनेक लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड (Greeting Cards) पाठवतील, कधीकधी भारतीय मिठाईच्या बॉक्ससह. सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण.

हा दीपोत्सव जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो. कृतज्ञतेचा आनंद उत्सवाचा, हा सोहळा मानला जातो. या सणाला सायंकाळी दारात पणत्या लावून रांगोळ्या काढतात, आकाशदिवे (Sky Lights) लावले जातात. या काळात लहान मुले मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात.

दिवाळी या सणाचे दिवस आणि दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व 

वसुबारस

गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताचा कृषिप्रधान संस्कृती मध्ये दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. फुले, अक्षता, हळद-कुंकू वाहतात.  त्यांच्या गळ्यात फुलांची माळ घालतात. अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात ह्या दिवसापासूनच  होते.

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी हा सण आश्विन कृष्ण त्रयोदशीस साजरा केला जातो.धनत्रयोदशी या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. महिला उपवास करून घरातले दागिणे अलंकार  काढून ते साफ करतात. या दिवसाला ‘धन्य तेरस’ असेही म्हणतात.  याच  दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी भगवान महावीर योगनिद्रेत गेले होते. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने ओळखला जातो. धनत्रयोदशीची पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

धनत्रयोदशीची पूजा कशी करावी? 

नरक चतुर्दशी

कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो नरक चतुर्दशी या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. फटाके उडवायला सुरुवात नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून होते,आणि भाऊबीजेच्या रात्री शेवट होतो. त्यानंतर उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवतात.

लक्ष्मीपूजन

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी ठेवतात. त्यात दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. याच दिवशी स्वच्छता करण्यासाठी नवी केरसुणी विकत घेतली जाते. तिला लक्ष्मी मानून तिला घालून हळद-कुंकू वाहून वापरण्यास सुरुवात केली जाते. केरसुणीने घर स्वच्छ होते घरातील दारिद्य्र नाहीसे होते असे मानतात.

बलिप्रतिपदा

बलिप्रतिपदा हा सण कार्तिक शुद्ध प्रतिपदेस साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. या दिवशी व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या नवीन वह्या सुरू होतात. नवीन वह्यांना हळद-कुंकू, फूल, वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा होतात. गायी – बैलांना रंग व माळा लावून सजवतात.

भाऊबीज

भाऊबीज हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेस साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गोडधोड भोजन करण्यासाठी जातात आणि सायंकाळी बहीण भावाला ओवाळते. भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देतो.

आपणास आणि आपल्या परिवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!

Leave a comment

विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार: रोहित शर्मा – ५०* संत ज्ञानेश्वर १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे (Famous places in Mumbai) एक साहसी खेळ – कुस्ती