धनत्रयोदशीची पूजा कशी करावी? (Laxmi pujan)

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे देवता धन्वंतरींची पूजा केली जाते. बर्याच घरांमध्ये या दिवशी लक्ष्मीपूजना (Laxmi pujan) ही केले जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती पुढिलप्रमाणे.

धनत्रयोदशी ला धन्वंतरीची पूजा करण्यासाठी चौरंग मांडावा, त्यावर लाल वस्त्र टाकून घ्यावे. त्यानंतर कलशाची स्थापना करावी या कलशामध्ये पाणी भरून घेतल्यानंतर त्यात सुपारी एक फूल, हळद, कुंकू, अक्षता, टाकाव्या आणि त्यानंतर विड्याच्या पानांवर एक नारळ ठेवावा. कलश स्थापन झाल्यानंतर धन्वंतरींची मूर्ती किंवा धन्वंतरींचा फोटो घ्यावा आणि त्या फोटोची स्थापना करावी. फोटो ठेवण्याआधी खाली स्वस्तिक काढून घ्यावा आणि त्या स्वस्तिका वरच धन्वंतरींची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.

पूजेची सुरुवात गणेशपूजनाने करावी. एक सुपारी घ्यावी ती सुपारी गणपती म्हणून स्थापन करावी. त्यासाठी त्यासुपारीला आधी शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा. त्याचबरोबर दुधाने अभिषेक घालावा. हळदी कुंकू तसंच फूल या सगळ्यांनी अभिषेक घालून. गणरायाची पूजा करावी, गणपतीची मूर्ती विड्याच्या पानांवर स्थापित करावी. त्यानंतर त्या गणपतीला हळदी कुंकू, अक्षता आणि फुल अर्पण करावा. गणरायाची मनोभावे प्रार्थना करावी. या पूजे मध्ये आणखीन एक गोष्ट ठेवली जाते आणि ती म्हणजे माता लक्ष्मी ची मूर्ती किंवा माता लक्ष्मी चा फोटो धनत्रयोदशीच्या दिवशी आणि घरांमधून लक्ष्मीपूजन ही केला जातो. जर तुमच्याकडे माता लक्ष्मी ची मूर्ती ही नसेल, फोटो ही नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि ती सुपारी मातालक्ष्मी म्हणून स्थापित करू शकता. त्यासाठी दोन विड्याची पाने ठेवावी. आणी या लक्ष्मी रूपी सुपारीलासुद्धा आपण अभिषेक करा. शुद्ध पाण्याने अभिषेक घाला. दुधा ने अभिषेक घाला. त्यानंतर कुंकू आणि फुलांनी ही अभिषेक घालवा. याप्रकारे आपण लक्ष्मी मातेला अभिषेक घातल्या नंतर तिची स्थापना होते. हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुल लक्ष्मी मातेला अर्पण करावे.

आता धन्वंतरींच्या पूजे कडे वळल्या. धन्वंतरींची पूजा करण्यासाठी एक फूल घ्या. त्याफुलाने प्रोक्षण करा. म्हणजे शुद्ध पाणी फोटो वर शिंपडा. त्याप्रमाणे दुधा ने अभिषेक करा. म्हणजे थोडासा दूध शिंपडा. त्यानंतर फोटो स्वच्छ पुसून घ्यावा. आता धन्वंतरींना हळदी कुंकू अष्टगंध हे सगळं अर्पण करा.फुल वाहा.याप्रकारे पंचोपचारे धन्वंतरींची पूजा पूर्ण होणार करा. धनत्रयोदशीच्या पूजे मध्ये आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे या दिवशी धान्याची पूजा केली जाते. पाच प्रकारचे वेगवेगळे धान्य घेतात. या धान्याची पूजा करताना.या पूजे मध्ये सुद्धा हळदी कुंकू अक्षता वाहून फुल अर्पण करा. ही पूजा जशी जशी पूर्णत्वाकडे जाते तसा आपलं मन ही शुद्ध पवित्र आणि सकारात्मक होत जातं यात शंकाच नाही. काही जणांकडे धनत्रयोदशी ला लक्ष्मी पूजन ही केलं जातं. त्यामुळे घरात ला सोनं नाणं किंवा पैसे ही मग ते लक्ष्मीपूजना मध्ये ठेवतात. पण इथे आपण धनत्रयोदशी ची पूजा करतो आहोत म्हणजे धन्वंतरींची आणि धान्याची पूजा करतो आहोत.

अनेक ठिकाणी आयुर्वेदिक औषध सुद्धा या पूजे मध्ये ठेवली जातात तशी तुमच्याकडे पद्धत असेल तशा गोष्टी तुम्ही पूजे मध्ये ठेवू शकता. गावा नुसार शहरा नुसार प्रदेशा नुसार या पूजे मध्ये थोडा फार फरक नक्कीच आढळतो. पण सर्वसाधारण पणे धन्वंतरींची पूजा सगळीकडेच केली जाते.

आता याप्रकारे धन्वंतरींची पूजा करून झाली. धान्या ची पूजा करून झाली. आता नवेद्य. नवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करावी. यामध्ये गणपती च्या आरती ने सुरुवात करायची. त्यानंतर महालक्ष्मीची आरती सुद्धा म्हणायची असते.

धन्वंतरींच्या मंत्राचा जप करायचा.अगदी सगळं करायला नाही जमलं तरी यातल्या ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्या गोष्टी अवश्य करावा. या दिवशी 13 दिवे या पूजे भोवती लावावे किंवा तुमच्या घरा मध्ये सुद्धा प्रत्येक कोपऱ्या मध्ये माती चा एक तरी दिवा लावा. घर पूर्ण दिव्यांनी उजळून टाका.

सगळ्यात महत्वाचं या दिवसाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे कणकेचा एक दिवा लावतात. त्याला यम दीप असं म्हणतात. या दिवशी तेल आणि वात घालून घराच्या बाहेर दक्षिणे ला दिवा पेटवला जातो आणि दक्षिणेकडे तोंड करून यमराजाची प्रार्थना केली जाते. धन्वंतरींची पूजा झाल्यानंतर या प्रमाणे यम दीपदान ही आवश्य करावे. त्यामुळे घरातल्यांचा अपमृत्यू टळ तो. सगळ्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. दक्षिण दिशा ही धर्माची दिशा मानली जाते आणि यम धर्म हे मृत्युची देवता आहे.

म्हणून या दिवशी त्यांची पूजा ही केला जातो. या पूर्ण पूजासाठी आपल्याला पुढील साहित्य लागते धन्वंतरींचा फोटो कलश, नारळ, विड्याची पानं पूजेचा ताट, पंचामृत किंवा दूध, धने, गुळ, कापूर, हळद, कुंकू, अक्षदा, झेंडू ची फुलं इत्यादी.

1 thought on “धनत्रयोदशीची पूजा कशी करावी? (Laxmi pujan)”

Leave a comment