मुंबईतील चार प्रसिद्ध ठिकाणे भाग २ (Four Famous Places in Mumbai Part 2)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)

सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सीएसएमटीचे आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (Victoria Terminus) असे होते, हे मुंबई शहरामधील सर्वात मोठे व एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक (Railway Station) आहे. येथे मध्य रेल्वेचे मुख्यालयसुद्धा (Head Office) आहे. सीएसएमटी हे स्थानक मुंबईच्या बोरीबंदर भागात आहे हे स्थानक इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.

छत्रपती शिवाजी टर्मिनस हे महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य ठरले आहे. जून २०१३ मध्ये महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली.  येथे १८ फलाट असून पहिले सात फलाट क्रमांक हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. व आठ ते आठरा क्रमांकाचे फलाट हे  ते  मुख्य मार्गिकेवरील आहेत तेथून शहराचा बाहेर जाणाऱ्या जलद गाड्या जातात.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Chhatrapati Shivaji Maharaj Park)

छत्रपती शिवाजी महाराज पार्क इ.स. १९२५मध्ये मुंबई नगर पालिकेने (BMC) जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते.छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबईच्या दादर या भागामधे आहे. हे मैदान सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.या मैदानावर एका बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा (Statue of Shivaji Maharaj) इ.स. १९६६ मध्ये उभारण्यात आला.

शिवाजी पार्क हे खूप मोठ्या इतिहासाचं साक्षीदार आहे. अनेक खेळाडूंनी त्यांचा करियरची सुरुवात याच मैदानातून केली आहे. आणि आज त्याखेळाडूंपैकी अनेक खेळाडू आपल्या राज्याचं किंवा देशाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरन यांनी क्रिकेटला गौरव मिळवून दिला. त्यांनीसुद्धा त्यांचा लहानपणी क्रिकेटचा सराव हा या शिवाजी पार्कवरच केला आहे आणि त्यानंतर त्यांनी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली.

दादासाहेब फाळके चित्रनगरी (Dadasaheb Phalke Chitranagari)

दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्म सिटी (Film City) ही मुंबई मधील गोरेगाव पूर्व (Goregoan East) या ठिकाणी आहे. हे एक फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स (Copmlex) आहे जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ वसलेले आहे. यात अनेक थिएटर रेकॉर्डिंग रूम, बागा, तलाव, आणि मैदाने आहेत जी अनेक मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांचे (Bollywood Films) ठिकाण म्हणून काम करतात. 1977 मध्ये चित्रपट उद्योगाला सुविधा आणि सवलती देण्यासाठी राज्य सरकारने याची निर्मिती केली होती. 

फिल्म सिटीचा आराखडा व्ही. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली.भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक मानले जाणारे भारतातील पहिले निर्माता-दिग्दर्शक-पटकथा लेखक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ 2001 मध्ये तिचे नाव दादासाहेब फाळके चित्र नगरी असे ठेवण्यात आले. हे जवळपास सर्वच बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंगचे ठिकाण आहे. मंदिर, तुरुंग, न्यायालय, तलाव, पर्वत, कारंजे, गावे, पिकनिक स्पॉट्स, बागा आणि मानवनिर्मित धबधब्याचे कायमस्वरूपी सेट यासह शूटिंगसाठी अनेक प्रकारची लोकेशन उपलब्ध आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park)

पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूत बोरिवली पूर्वला असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान  सुंदर दिसतं असं म्हणतात.मुंबई महानगरामध्ये वसलेलं 103 चौ.कि.मी चं हे जंगल शहराच्या धकाधकीच्या आयुष्यात जीवनाला मिळणारा हा समृद्ध आरोग्यदायी असा श्वास आहे. खरं तर याला मुंबईचं फुफ्फुसही (The lungs of Mumbai) म्हणतात 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 274 पेक्षा अधिक पक्षांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. आणि प्राण्यांच्या 35 प्रजाती आठळतात, उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 78 प्रजाती व फुलपाखरांच्या 170 पेक्षा जास्त  प्रजाती आढळतात. उद्यानात 1300 पेक्षा अधिक वृक्ष प्रजाती आहेत. मुंगूस, रानमांजर, अस्वल, अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यत: करंज, साग, बाभूळ, बोर, निवडुंग, बांबूची बेटं आपल्याला पहायला मिळतात.

Leave a comment