संत ज्ञानेश्वर – १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत (Sant Dnyaneshwar – A famous saint of the 13th century)

संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी (poet) होते. संत ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव, किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे योगी व तत्त्वज्ञ होते. ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात झाला. आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातिल पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे.त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. सोपानदेव व मुक्ताबाई ही ज्ञानेश्वरांची धाकटी भावंडे व निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. 

ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात संन्यासी होते. ज्ञानेश्वरांचे वडीलांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. त्यांचा गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत घराकडे पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. विठ्ठलपंत तीर्थयात्रेसाठी आळंदी येथे मुक्कामी येऊन तेथेच स्थायिक झाले. त्याकाळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना दिवस काढावे लागले. आळंदीच्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्यासाठी नकार दिला. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. धर्मशास्त्रींनी त्यावर देहदंडाची शिक्षा आहे असे सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून प्रायश्चित्त घेतले.

ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही लोकांकडून फार त्रास दिला गेला. अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी त्यांना नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. भिक्षा मागून ते आपला जीवन जगत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे अशा त्यांनी विचार केला. शेवटी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी पुनः समाजात सम्मिलित केले.

फक्त १६ वर्षांच्या (16 Years) लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली.या मराठी भाषेतील सर्वात जुन्या असलेल्या साहित्यकृती आहेत आणि यांची रचना मराठी साहित्यातील मैलाच्या मानल्या जातात. त्यांनी अनेक संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत. तत्त्वज्ञान व अध्यात्मविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येऊ शकतात असा विश्वास आपल्या ग्रंथकर्तृत्वातून संत ज्ञानेश्वरांनी निर्माण केला. त्यांच्यामुळे आध्यात्मिक प्रेरणा समाजातील सर्व थरांतील लोकांना  मिळाली.

ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिल्यानंतर ही भावंडे पंढरपूरला गेली. पंढरपूरला गेल्यानंतर त्यांची भेट नामदेवांसोबत झाली, व ते ज्ञानेश्वरांचे जवळचे मित्र बनले. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी भारतभरातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि तिथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायात दीक्षा दिली. 

ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना मेजवानी पंढरपूरला परतल्यावर देऊन सन्मानित करण्यात आले. मेजवानीच्या नंतर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली संजीवन समाधीबद्दल, ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधांबद्दल जोरदारपणे सांगितले आहे.संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या १३ व्या दिवशी, आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा एकवीस वर्षांचे असताना संजीवन समाधीत प्रवेश केला त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे.

ज्ञानेश्वर महाराज हे अजूनही जिवंत आहेत असा अनेक वारकरी भक्तांचा विश्वास आहे. 

Leave a comment

विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार: रोहित शर्मा – ५०* संत ज्ञानेश्वर १३ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि कवी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे (Famous places in Mumbai) एक साहसी खेळ – कुस्ती