घटस्थापना हा हिंदू धर्मातील एक विधी आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ही आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील पहिली तिथी आहे.. आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते घडा किंवा कलश याच्या ठिकाणी देवीची स्थापना केली जाते आणि याचे नऊ दिवस पूजन केले जाते
घटस्थापना आणि नवरात्रीची सविस्तर माहिती (Detailed information about Ghatasthana and Navratri)
भजन, कीर्तन तसेच अनेक देखाव्यांचे आयोजन हे नवरात्रीतील नऊ दिवस सर्वजण मोठ्या श्रद्धेने करतात. देवीची पूजा सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी केले जाते. ते बघायला लोक एकत्रित येतात. देवीचे व्रत पूर्ण करण्यासाठी अनेकजन नऊ दिवस उपवास करतात. नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. देवीप्रमाणे सर्व स्त्रियाही नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात. नवरात्रीमध्ये सर्वत्र सजावट पाहायला मिळते. मोठे-मोठे मंडप बघायला मिळतात. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे सार्वजनिक मंडळातर्फे केले जाते. स्त्रिया, पुरुष तसेच लहान मुलं दांडिया. गरबा खेळतात. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. नवरात्रीमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते.
शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व काय (What is the importance of Ghatstashana from the point of view of agriculture)
घटस्थापना करताना प्रथम एक भांडे घेतले जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलून घटाचे विसर्जन केले जाते. घटस्थापना हा सण पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात येतो तसेच रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याआधी घटस्थापना केली जाते. ही कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना असून बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक तसेच शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे.
घट नऊ दिवसच का बसवला जातो
असा सर्वांना पक्ष पडला असेल. तर त्याचे कारण बियांना रुजून अंकुर बाहेर पडण्यासाठी कमीतकमी आठ दिवसाचा कालावधी लागतो. घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. परंतू नवव्या दिवशी शेतकऱ्याकडून घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते. ज्या धान्याचे पिक जोमाने आले आहे ते पिक तो आपल्या शेतात पेरण्यासाठी निवडतो.