मुद्रांक शुल्क प्रमाणित प्रत कशी मिळवायची – महाराष्ट्रात/मुंबईत (How to get Stamp Duty Certified Copy – in Maharshtra / Mumbai)

Stamp Duty Certified Copy Or मुद्रांक शुल्क प्रमाणित प्रत कशी मिळवावी
Stamp Duty Certified Copy
Stamp Duty Certified Copy

एखाद्या जमिनीची किंवा फ्लॅटची खरेदी किंवा विक्री केल्या नंतर Government ला  Stamp Duty  देणे बंदनकरार आहे. Stamp Duty दिल्या नंतर त्याचा पुरावा आपल्याला मिळतो. पण अनेकदा असे होते कि आपल्या कडे असलेला पुरावा हरवतो तेव्हा आपण काय केले पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण पुढे घेऊया. 

Stamp Duty भरलेल्या पुराव्याची Certified Copy, मिळवण्यासाठी आपल्याकडे खालील माहिती असणे आवश्यक आहे 

१. Stamp Duty भरल्याची तारीख ( किंवा वर्ष ). 

२. Stamp Duty भरताना मिळालेला File Number . 

वरील पैकी कोणतीही एक माहिती आपल्याकडे असली पाहिजे. Stamp Duty Office Record Division मध्ये जाऊन शोध (Search ) हा फॉर्म भरवा लागेल हा फॉर्म भरल्यानंतर सात दिवस ते तीन महिने या कालावधी मध्ये आपण भरलेल्या Search Form मधील माहिती योग्य असेल तर त्यामध्ये Document चा File No, Date आणि Year दिलेले असते त्यानंतर आपण पुढील माहिती नुसार Certified Copy मिळवू शकता. 

Certified Copy मिळवण्यासाठी आपल्याला अर्ज क्रमांक २ ( Form No .२ )  हा Form भरून द्यावा लागतो. 

अर्ज क्रमांक २ करण्यासाठी खालील माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे  

१.  फाईल क्रमांक. 

२. Stamp Duty भारल्याची Date आणि Year. 

३. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र ID Card  ( Aadhar Card किंव्हा Pan Card  )

४. ५ रुपयांचा कोर्टफी 

वरील माहिती फॉर्म मध्ये ध्यावी व Form सोबत ID Card ( Aadhar Card किंव्हा Pan Card ) जोडावे आणि फॉर्मच्या डाव्या बाजूला (Left Corner of Form ) कोर्टफी (Court Fee Sticker ) चिटकवून रेकॉर्ड ऑफिस मधील अधिकाऱ्यांकडे Submit करावे.  

 Form भरून दिल्या नंतर आपले Documents किती पानांचा आहे हे लिहून देतील प्रत्येक पानासाठी (Page) ५ रुपये अशी रक्कम आपल्याला भरावी लागते .  Fees  भरल्या नंतर आपलयाला एक Receipt  मिळते ,Receipt मिळाल्यानंतर १५ दिवसामध्ये आपल्याला Certified Copy मिळते  

१.  रेकॉर्ड ऑफिस मधील अधिकाऱ्याकडून Certified Copy घ्यावी. २० रुपयाचा Court Fee Certified Copy वरती  चिटकवा. 

२. Certified Copy वरती शिक्के मारून घावेत. त्यावरती  Application no ,Date of application चेक करून घ्या.  

३. रेकॉर्ड ऑफिस मधीलअधिकाऱ्याकडून प्रमाणित प्रत तपासून घ्यावी व त्यांची सही घ्यावी. 

  आपल्याला मिळालेली प्रमाणित प्रत व्यवस्थित जपून ठेवावी.

आशा आहे की हे वरील Stamp Duty Or मुद्रांक शुल्क - प्रक्रियेत सर्वांना मदत करेल

Leave a comment