रोहित शर्माने केला विश्वविक्रम वर्ल्ड कप (World Cup) मध्ये सर्वाधिक सिक्सहिटिंगच्या (Six Hitting) लिस्टमध्ये ख्रिस गेलला (Chris Gayle) त्याने मागे टाकले आहे. रोहित शर्माने वर्ल्ड कप मध्ये फलंदाजी (Batting) करताना भारताला वेगवान सुरुवात करून दिली. रोहितने ख्रिस गेलचा एकाच स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार (Most Sixes) ठोकण्याचा विक्रम मोडला.
विश्वचषकात 48 वर्षांच्या इतिहासात 54 षटकार ठोकणारा रोहित पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी या स्पर्धेत रोहितने गेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही मोडला होता. रोहित शर्मा हा खेळाडू हिटमॅन (The Hitman) म्हणूनही ओळखला जातो.